राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची API महाराष्ट्र शाखेच्या सदस्यांनी घेतली भेट

0
10
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची API महाराष्ट्र शाखेच्या सदस्यांनी घेतली भेट
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची API महाराष्ट्र शाखेच्या सदस्यांनी घेतली भेट

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची API महाराष्ट्र शाखेच्या सदस्यांनी घेतली भेट

मुंबई :
असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (API)च्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मानद सचिव डॉ. आगम वोरा यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या सदस्यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांना राष्ट्रीय महत्त्वाची दोन वैद्यकीय प्रकाशने भेट देण्यात आली.
यामध्ये ‘Unified Consensus on Adult Immunization 2026’ या प्रकाशनाचा समावेश आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने विविध वैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने हे प्रकाशन तयार केले असून, प्रौढांच्या लसीकरणाबाबत तज्ज्ञांचे एकत्रित मार्गदर्शन आणि शिफारसी यामध्ये देण्यात आल्या आहेत.

दरवर्षी विषाणूजन्य संसर्गामुळे देशात सुमारे पाच लाख नागरिकांचा मृत्यू होतो. लसीकरणाच्या माध्यमातून यातील अनेक मृत्यू टाळता येऊ शकतात, अशी माहिती डॉ. वोरा यांनी यावेळी दिली.

दुसरे प्रकाशन ‘COPD Compass 2026’ या शीर्षकाचे असून, भारतातील COPD (Chronic Obstructive Pulmonary Disease – दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसविकार) व्यवस्थापनासाठी हे सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे. भारतातील COPD व्यवस्थापनासंदर्भात तज्ज्ञांच्या पॅनेलने केलेल्या शिफारसींचा यात समावेश आहे. COPDचे निदान आणि उपचार याबाबतही या प्रकाशनातून मार्गदर्शन करण्यात आले आहे.

या भेटीदरम्यान डॉ. राकेश बडदे, डॉ. मिलिंद नाडकर्णी, डॉ. अमित सराफ, डॉ. जयस लेले, आशुतोष पांडे तसेच झायडस हेल्थकेअरच्या एमडी स्वाती दलाल यांच्यासह API महाराष्ट्र शाखेचे इतर सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here