संरक्षण मंत्र्यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवीमार्गे अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी

0
8

सिंधुदुर्ग :

देशाचे संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रशासनाच्या विनंतीनुसार २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली चेकपोस्टवरून पत्रादेवीमार्गे गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

संरक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. प्रशासनाने प्रवेशबंदीची वेळ सुधारित करून दुपारी ४ ते रात्री १० अशी निश्चित केली आहे.
या कालावधीत नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अवजड वाहनचालकांनी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या कालावधीत पत्रादेवीमार्गे गोव्याच्या दिशेने प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here