नेरूळमध्ये ₹६.५० कोटींच्या भव्य पादचारी उड्डाणपुलाचे लोकार्पण

0
5
नेरूळमध्ये ₹६.५० कोटींच्या भव्य पादचारी उड्डाणपुलाचे लोकार्पण
नेरूळमध्ये ₹६.५० कोटींच्या भव्य पादचारी उड्डाणपुलाचे लोकार्पण

नेरूळमध्ये ₹६.५० कोटींच्या भव्य पादचारी उड्डाणपुलाचे लोकार्पण

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नांना यश; नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाला मिळणार मोठा दिलासा

नवी मुंबई :
सायन-पनवेल महामार्गावरील एस. बी. आय. कॉलनी, नेरूळ परिसरात नागरिकांना रस्ता ओलांडताना होणारा त्रास आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन उभारण्यात आलेल्या भव्य पादचारी उड्डाणपुलाचे लोकार्पण आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि अर्थसंकल्पीय निधीतून ₹६.५० कोटी खर्च करून हा पादचारी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने एस. बी. आय. कॉलनी परिसरातील नागरिक व पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच अपघाताचा धोका कायम होता. या पार्श्वभूमीवर हा उड्डाणपूल नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी सज्ज झालेल्या या पादचारी उड्डाणपुलामुळे महामार्ग ओलांडताना नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, परिसरातील वाहतूक सुरक्षेलाही हातभार लागणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यास आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यासह श्री. ओमप्रकाश पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मेश्राम, श्री. अमोल सोनोने, श्री. निलेशजी म्हात्रे, उपविभागीय अभियंता पिरजादे, उपविभागीय अभियंता बिडवई, उपविभागीय अभियंता कुंगराळकर, तसेच अनिता शेट्टी, ज्योती पाटील, महेंद्र नाईक, प्रभाकर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
या पादचारी उड्डाणपुलामुळे एस. बी. आय. कॉलनी, नेरूळ परिसरातील नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला असून, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here