वाकोला येथे ८ सप्टेंबरला ‘समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स’ची व्यावसायिक मीटिंग

0
81

मुंबई :
मराठी व्यावसायिकांना एकत्र आणत व्यापार व व्यवसायवृद्धीसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या **‘समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स’**ची व्यावसायिक मीटिंग ८ सप्टेंबर रोजी वाकोला, सांताक्रूझ येथे आयोजित करण्यात आली आहे.
मराठी व्यावसायिकांनी, मराठी व्यावसायिकांसाठी आणि त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी कार्यरत असलेले हे व्यासपीठ व्यवसायाच्या माध्यमातून व्यावसायिकांना जोडण्याबरोबरच नव्या संधी उपलब्ध करून देणे आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीला चालना देण्याचे काम करत आहे.
‘समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स’ने आपल्या स्थापनेपासून अवघ्या एका वर्षात उल्लेखनीय वाटचाल केली आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे या चार जिल्ह्यांत चेंबरचे कार्य सुरू असून दादर, चारकोप, ठाणे, पालघर आणि पिंपरी-चिंचवड येथे पाच सक्रिय चॅप्टर्स कार्यरत आहेत.
लवकरच पुणे, सोलापूर आणि कोकण येथेही नवीन चॅप्टर्स सुरू करण्यात येणार आहेत. सध्या चेंबरच्या माध्यमातून १५० हून अधिक मराठी व्यावसायिकांचे जागतिक नेटवर्क तयार झाले आहे. व्यावसायिकांच्या परस्पर सहकार्याला आणि नव्या व्यावसायिक संधींना चालना देणारी ही मीटिंग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here