जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन

0
26
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीवर आधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांची मागील तीन वर्षांतील कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित केली जाणार असून, या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचे वाटप, पुढील तीन वर्षांचे कार्यनियोजन तसेच भविष्यातील नियुक्त्यांच्या वेळी करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात सेवाज्येष्ठतेसोबतच प्रत्यक्ष कामगिरी, नेतृत्वक्षमता, रुग्णसेवा, आर्थिक शिस्त, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांना महत्त्व मिळणार आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार पुढील संधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था निर्माण होणार असल्याने अधिकारी वर्गाचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे.
‘कामगिरीला मान्यता आणि गुणवत्तेला संधी’ या सूत्रावर आधारित ही व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीला नवी दिशा देणारी ठरणार आहे. कामगिरीआधारित प्रशासकीय कार्यसंस्कृतीमुळे अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यासोबतच आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यास आणि लोकाभिमुख आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्यास हातभार लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here