जनतेचा विश्वास संपादन करणे हीच प्रशासकीय कारकिर्दीची खरी कसोटी

0
29
जनतेचा विश्वास संपादन करणे हीच प्रशासकीय कारकिर्दीची खरी कसोटी
जनतेचा विश्वास संपादन करणे हीच प्रशासकीय कारकिर्दीची खरी कसोटी

जनतेचा विश्वास संपादन करणे हीच प्रशासकीय कारकिर्दीची खरी कसोटी

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन; संविधान, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुखतेला प्राधान्य देण्याचे आवाहन

पुणे :
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे आयोजित एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते सीपीटीपीच्या संकेतस्थळाचे अनावरण तसेच प्रशिक्षण मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

नागरी सेवेत कार्यरत असताना देशाच्या राज्यघटनेला सर्वोच्च प्राधान्य देतानाच प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, लोकाभिमुखता आणि निर्णय घेण्याचे धैर्य या मूल्यांना आपल्या कार्याचा आधार बनवावा. जनतेचा विश्वास संपादन करणे हीच प्रशासकीय कारकिर्दीची खरी कसोटी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले.
प्रशिक्षणादरम्यान कायदे, नियम, कार्यपद्धती, तंत्रज्ञान आणि प्रशासनातील विविध पैलू शिकणे महत्त्वाचे आहेच; मात्र त्यासोबत स्वतःचे चारित्र्य घडविणेही तितकेच आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि विविध प्रकारच्या दबावांना सामोरे जाताना जनतेचा विश्वास संपादन करणे आणि तो सातत्याने टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रशासन हे केवळ कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित न ठेवता जनतेमध्ये जाऊन काम करण्याचा संदेश त्यांनी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना दिला.
गाव, शाळा आणि आरोग्य केंद्रांना भेटी देऊन शेतकरी, कामगार, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांशी थेट संवाद साधावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले. समाजातील विविध घटकांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेतल्यास अधिक लोकाभिमुख प्रशासन उभारण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि यशदाच्या सीपीटीपी विभागाच्या प्रमुख पौर्णिमा गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here