रविवारी १२ सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा बँक सेवा देणार

0
23
रविवारी १२ सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा बँक सेवा देणार
रविवारी १२ सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा बँक सेवा देणार

रविवारी १२ सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा बँक सेवा देणार

गणेशोत्सवाच्या काळात ग्राहकांना दिलासा; अध्यक्ष मनीष दळवी यांचा निर्णय

सिंधुदुर्ग :
ऐन गणेशोत्सवात बँकांचा संप आणि त्यात वीकेंड आल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना सिंधुदुर्ग जिल्हा बँक नागरिकांच्या सेवेसाठी रविवारीही सुरू राहणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी १२ सप्टेंबर रोजी जिल्हा बँकेचे कामकाज नियमित वेळेत सुरू ठेवण्याची मागणी मळेवाडचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडे केली होती.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा सण असून, अनेकजण प्रसंगी कर्ज काढून हा उत्सव साजरा करतात. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका बंद असल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचणी येत असल्याचे मराठे यांनी अध्यक्ष दळवी यांच्या निदर्शनास आणून दिले.
यानंतर अध्यक्ष मनीष दळवी यांनी तातडीने निर्णय घेत रविवारी १२ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँक नागरिकांच्या सेवेसाठी नियमित वेळेत सुरू ठेवण्याचे सांगितले.
या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्गवासीयांना मोठा दिलासा मिळाला असून, अध्यक्ष मनीष दळवी तसेच जिल्हा बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here