अलिबागच्या ‘उदया बाजार’ला पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट

0
14
अलिबागच्या ‘उदया बाजार’ला पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट
अलिबागच्या ‘उदया बाजार’ला पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट

अलिबागच्या ‘उदया बाजार’ला पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट

दया बाजार’ला पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट

अलिबाग :
टाटा कम्युनिकेशन्सच्या सीएसआर उपक्रमांतर्गत २०१९ पासून रायगड जिल्ह्यात ‘प्रकल्प उदया’च्या माध्यमातून महिला व दिव्यांग व्यक्तींसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआय) यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते.
या प्रशिक्षणातून तयार झालेल्या महिला उद्योजिकांच्या वस्तू व उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘उदया महिला उद्योजिका असोसिएशन’च्या माध्यमातून अलिबाग येथे ‘उदया बाजार’ आउटलेट स्टोअर सुरू करण्यात आले आहे. या स्टोअरला राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी सदिच्छा भेट देत उपक्रमाची पाहणी करून त्याचे कौतुक केले.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा उद्योग केंद्राचे उपआयुक्त जी. एस. हरळय्या, जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत कळंबे, महिला असोसिएशनच्या पल्लवी जोशी, रजनी पाठक, अश्विनी सकपाळ, ईडीआय प्रशिक्षक जॅकी सर तसेच उद्योजक मयूर ठक्कर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत ईडीआयचे प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here