जागतिक बांबू दिनानिमित्त विशेष कव्हरचे प्रकाशन

0
6
जागतिक बांबू दिनानिमित्त विशेष कव्हरचे प्रकाशन
जागतिक बांबू दिनानिमित्त विशेष कव्हरचे प्रकाशन

जागतिक बांबू दिनानिमित्त विशेष कव्हरचे प्रकाशन

चंद्रपूर :
जागतिक बांबू दिनानिमित्त चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात १८ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष कव्हरचे प्रकाशन करण्यात आले. बल्लारपूरचे आमदार तथा महाराष्ट्राचे माजी वनमंत्री सुधीर एस. मुनगंटीवार यांच्या हस्ते या विशेष कव्हरचे अधिकृत प्रकाशन झाले.
या प्रसंगी विशेष कव्हर व त्यावर स्मरणार्थ शिक्का असलेला पहिला व्हीआयपी अल्बम नागपूर विभागाचे टपाल सेवा संचालक डॉ. सुधीर जाखेरे (आयपीओएस) यांच्या हस्ते सुधीर एस. मुनगंटीवार यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
टपाल विभाग आणि बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली, जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला. टपाल तिकीट संग्रहाच्या माध्यमातून बांबू विज्ञान, संशोधन, नवोपक्रम, शाश्वत उपजीविका आणि हरित अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला आर. एम. रामानुजम, आयएफएस, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक, प्रभूनाथ शुक्ला, आयएफएस, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, उमेश उदल वर्मा, आयएफएस, संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) तसेच दिव्यभारती एम., आयएफएस, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ (एफडीसीएम), चंद्रपूर विभाग यांच्यासह वन व टपाल विभागातील अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here