वात्सल्य ट्रस्टच्या ५० अनाथ मुलींना अमित ठाकरेंकडून लालबागच्या राजाचे दर्शन

0
21

नवी मुंबई :
वात्सल्य ट्रस्ट, सानपाडा येथील अनाथ मुलींनी रक्षाबंधनानिमित्त अमित राजसाहेब ठाकरे यांच्याकडे “अमित दादा, आम्हाला लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायचे आहे…” असा प्रेमळ आग्रह केला होता. हा आग्रह पूर्ण करत अमित ठाकरे यांनी मुलींना लालबागच्या राजाचे दर्शन घडवून आणले.
सुमारे ५० मुलींसाठी नवी मुंबईपासून लालबागपर्यंत सुरक्षित खासगी बस प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. तसेच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाशी संपर्क साधून मुलींच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली.
या संपूर्ण उपक्रमादरम्यान अमित ठाकरे स्वतः उपस्थित होते. मुलींना दर्शन व्यवस्थित पार पडावे, यासाठी त्यांनी आवश्यक ती व्यवस्था पाहिली. दर्शनानंतर मुली परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये बसेपर्यंत त्यांनी त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि त्यांना निरोप दिला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने व्यक्त केलेली इच्छा पूर्ण झाल्याने मुलींमध्ये आनंदाचे वातावरण होते. या भेटीतून सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीचा अनुभव आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here