महापौर रितू तावडे यांनी वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दिली भेट

0
17

गणेशमूर्तीचे दर्शन घेत मुंबईकरांच्या मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना

मुंबई :
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी वांद्रे पश्चिम येथील वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य गणेशोत्सवाला भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या उत्सवाच्या नियोजनाची आणि विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली उत्सवाचे शिस्तबद्ध नियोजन आणि जनसेवेशी संबंधित उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महापौर रितू तावडे यांनी गणरायाचे दर्शन घेऊन मुंबईकरांच्या सुख-समृद्धी आणि मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. तसेच मंडळाच्या सामाजिक कार्याला गणरायाचा आशीर्वाद मिळावा, अशी भावना व्यक्त केली.
गणेशोत्सवानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here