ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचे मुंबईत निधन

0
16
CNN-News18 च्या सहाय्यक संपादक; वयाच्या ४६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
CNN-News18 च्या सहाय्यक संपादक; वयाच्या ४६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचे मुंबईत निधन

CNN-News18 च्या सहाय्यक संपादक; वयाच्या ४६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई :
CNN-News18 च्या सहाय्यक संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता (४६) यांचे रविवारी, २० सप्टेंबर रोजी मुंबईत अचानक निधन झाले. शनिवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना पहाटे सुमारे २ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची नाडी बंद पडल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले.
पायल मेहता या संसद, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय राजकारणाशी संबंधित विषयांचे वार्तांकन करत होत्या. संसद अधिवेशनाच्या काळात त्या नियमितपणे वार्तांकनासाठी उपस्थित राहत असत. त्यांच्या निधनानंतर पत्रकारिता क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायल मेहता यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे स्मरण केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here