संगमेश्वर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी; आरक्षण असूनही ट्रेनमध्ये चढताना अडचणी

0
15

गणेशोत्सवानंतर शहरांकडे परतणाऱ्या कोकणवासीयांचे हाल

संगमेश्वर :
गणेशोत्सव आणि गौरी उत्सव साजरा करून कोकणवासी आता आपापल्या नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी परतू लागले आहेत. त्यामुळे संगमेश्वर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, आरक्षण असलेल्या प्रवाशांनाही रेल्वेत चढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. उत्सवाची सांगता झाल्यानंतर मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे.
संगमेश्वर स्थानकावरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने रेल्वेगाडीत प्रवेश करताना प्रवाशांची मोठी तारांबळ उडत आहे. आरक्षण असूनही गर्दीमुळे संबंधित डब्यात पोहोचणे आणि ट्रेनमध्ये चढणे प्रवाशांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस स्थानकावर उपस्थित असून, प्रवाशांना सुरक्षितपणे रेल्वेत चढता यावे तसेच गर्दीचे नियोजन करता यावे यासाठी शक्य ती मदत करत आहेत. पोलीस कर्मचारी प्रवाशांना मार्गदर्शन करत असून, गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गणेशोत्सवानंतर कोकणातून मोठ्या संख्येने चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाल्याने पुढील काही दिवस रेल्वे स्थानकांवर गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here