मतदार यादीत नाव नाही? १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे
मतदार यादीत नाव नाही? १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे
विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन; आपल्या मतदान केंद्रावरच नोंदणीची सुविधा
मुबई :
मतदार यादीत अद्याप नाव नोंदवलेले नाही अशा नागरिकांसाठी १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष शिबिरांमध्ये नागरिकांना आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी नमुना ६ (Form 6) वापरला जातो. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर मतदार नोंदणी, नाव शोधणे आणि मतदार यादीशी संबंधित विविध सुविधा उपलब्ध आहेत.
विशेष शिबिरांच्या तारखा : 📅 १९ सप्टेंबर २०२६ 📅 २० सप्टेंबर २०२६ 📅 २६ सप्टेंबर २०२६ 📅 २७ सप्टेंबर २०२६
मतदार यादीत नाव नाही? तर आपल्या मतदान केंद्रावर जाऊन विशेष मतदार नोंदणी शिबिराचा लाभ घ्या!