खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी आप्तेष्टांची मांदियाळी
भिवंडी :
भिवंडीचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या विघ्नहर्त्या गणरायाच्या दर्शनासाठी आप्तेष्ट, नातेवाईक तसेच सहकारी मित्रांनी आवर्जून उपस्थिती लावली. गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्वांच्या उपस्थितीने घरातील उत्सवी वातावरण अधिकच चैतन्यमय झाले.

यावेळी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी उपस्थितांचे स्वागत करत, सर्वांनी वेळात वेळ काढून दिलेली सदिच्छा भेट आणि बाप्पाच्या चरणी वाहिलेली श्रद्धा आपल्यासाठी अत्यंत मोलाची असल्याचे सांगितले. सर्वांच्या आगमनाने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.



