भायंदर पश्चिम उड्डाणपुलाखाली धोकादायक खड्डे; अपघात झाल्यास जबाबदार कोण?
भायंदर पश्चिम उड्डाणपुलाखाली धोकादायक खड्डे; अपघात झाल्यास जबाबदार कोण?
भायंदर :
भायंदर पश्चिम उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित रस्त्यांच्या पायाभूत सुविधांची जबाबदारी एमबीएमसी अथवा एमएमआरडीएकडे असतानाही हे खड्डे अद्याप कायम असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल साहिल शेख यांनी उपस्थित केला आहे. अपघातानंतर जखमी नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना उत्तर कोण देणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरणारे खड्डे तातडीने बुजविणे आणि रस्त्याची आवश्यक देखभाल करणे गरजेचे आहे. रस्ते सुरक्षा ही केवळ घोषणा किंवा निविदांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष जमिनीवर वेळेवर देखभाल आणि जबाबदारीची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.
अपघात होण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने या खड्ड्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील व्हिडिओ साहिल शेख यांच्या सौजन्याने उपलब्ध झाला आहे.