सावंतवाडी तालुक्यात विकासकामांची पाहणी; जलसंधारण व पाणीपुरवठ्याला प्राधान्य

0
15
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली CEO अपूर्वा बासुर यांचा संयुक्त दौरा

सावंतवाडी :
जिल्ह्यातील विकासकामांना गती देतानाच दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण आणि पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर (IAS) यांनी सावंतवाडी तालुक्याचा संयुक्त दौरा केला.
या दौऱ्यात नेमळे, वेत्ये, बांदा आणि भालावल येथे विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. संबंधित योजनांची सद्यस्थिती, कामांची प्रगती आणि योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
दुष्काळसदृश परिस्थितीचा संभाव्य परिणाम लक्षात घेता पाणीपुरवठा आणि जलसंधारणाच्या कामांना विशेष महत्त्व देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here