उरण नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांचा विशेष मुलांसोबत वाढदिवस साजरा

0
16

उरण :
उरणच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी आपला वाढदिवस विशेष मुलांसोबत साजरा करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वीक-स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान संचलित सीबर्ड विशेष मुलांची शाळा, नवःशांती, बोरी नाका, मोरा रोड, उरण येथे भेट देत विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले.

यावेळी विशेष मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य, त्यांच्या मनातील आनंद आणि आपुलकीचा अनुभव भावनाताई घाणेकर यांच्यासाठी समाधान देणारा ठरला. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्यासोबत वेळ घालवला.
वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना खाऊ तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून मुलांच्या आनंदात सहभागी होत वाढदिवसाचा दिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
“माझ्या वाढदिवसानिमित्त मिळालेला हा प्रेमाचा आणि आशीर्वादाचा ठेवा माझ्यासाठी सदैव अविस्मरणीय राहील,” असे भावनाताई घाणेकर यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here