सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार अधिकारीपदी अरुणा हसबे; १ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला

0
17
सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार अधिकारीपदी अरुणा हसबे
सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार अधिकारीपदी अरुणा हसबे

सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार अधिकारीपदी अरुणा हसबे

१ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला

सिंधुदुर्ग :
महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, सहाय्यक संचालक संवर्गातील सहाय्यक संचालक अरुणा लक्ष्मणराव हसबे यांची प्रशासकीय बदली जिल्हा परिषद, कोल्हापूर येथून सिंधुदुर्गच्या जिल्हा कोषागार अधिकारीपदी करण्यात आली आहे. त्यांनी दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा कोषागार अधिकारी, सिंधुदुर्ग या पदाचा कार्यभार स्वीकारला.
जिल्हा कोषागार अधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी अरुणा हसबे या उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर कार्यरत होत्या. यापूर्वी त्यांनी जिल्हा कोषागार कार्यालय, कोल्हापूर येथे अपर कोषागार अधिकारी तसेच प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी म्हणूनही कामकाजाची जबाबदारी सांभाळली आहे.
कोषागार कार्यालयातील विविध कामकाजाचा त्यांना अनुभव असून, त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयाच्या कामकाजासाठी लाभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here