पोषणातून आरोग्याचा संदेश; वाकवलीत राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम उत्साहात
दापोली | प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत दापोली तालुक्यातील दाभोळ प्रकल्पाच्या वाकवली बीटमध्ये नववा राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. बालके, माता तसेच ग्रामस्थांमध्ये सकस व संतुलित आहाराबाबत जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. प्रवेशद्वारावर पाहुण्यांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी विविध पौष्टिक आहारांच्या पाककृतींचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉलही उभारण्यात आले होते.



