महात्मा गांधी जयंतीनिमित्त घाटकोपरमध्ये विशेष स्वच्छता मोहीम; महापौर रितू तावडे यांचा सहभाग

0
14

मुंबई :
महात्मा गांधी जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घाटकोपर पूर्वेतील प्रभाग क्रमांक १३२ मधील गारोडिया नगर येथील सातीकृपा संकुल परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होत शुभारंभ केला आणि नागरिकांसोबत श्रमदान केले. रितू तावडे या २०२६ पासून मुंबईच्या महापौरपदी आहेत.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त घाटकोपरमध्ये विशेष स्वच्छता मोहीम;
महात्मा गांधी जयंतीनिमित्त घाटकोपरमध्ये विशेष स्वच्छता मोहीम;
या मोहिमेदरम्यान स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. यामुळे उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले गेले. महापौर रितू तावडे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसरातील रस्ता स्वच्छ केला आणि नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
या स्वच्छता मोहिमेत ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे, स्थानिक रहिवासी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्वच्छ परिसर, निरोगी नागरिक आणि सुंदर शहरासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, स्वच्छता कायम राखण्याचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here