महाराष्ट्र राज्य सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेच्या मूल्यमापनासाठी समिती स्थापन होणार

0
11

पुणे :
महाराष्ट्र राज्य सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेचे मूल्यमापन करून तिच्या उद्दिष्टांची पूर्तता आणि कार्यप्रणालीची तपासणी करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत कृषी आयुक्तांसह एकूण आठ सदस्यांचा समावेश असणार आहे.
समितीमध्ये कृषी आयुक्तांव्यतिरिक्त कृषी विभाग, राज्य कृषी विद्यापीठ, सेंद्रिय प्रमाणीकरण, बीज प्रमाणीकरण आणि कृषी पणन क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
समितीतील सदस्यांमध्ये संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषी आयुक्तालय, पुणे, राज्य कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती विभागाचे प्रमुख, संचालक, महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा, अकोला, संचालक, महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा, अकोला, संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि संचालक (आत्मा), कृषी आयुक्तालय, पुणे यांचा समावेश असेल. याशिवाय एक निमंत्रित सदस्यही समितीत असणार आहे.
ही समिती महाराष्ट्र राज्य सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेऊन तिच्या उद्दिष्टपूर्तीचे मूल्यमापन करणार आहे. तसेच यंत्रणेच्या कार्यप्रणालीतील आवश्यक बाबींची तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here