पुण्यात २१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा; २६ संघांचा सहभाग

0
8
पुण्यात २१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा; २६ संघांचा सहभाग
पुण्यात २१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा; २६ संघांचा सहभाग

पुण्यात २१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा; २६ संघांचा सहभाग

पुणे :
२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ चे उद्घाटन ६ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्य राखीव पोलीस दल, बल गट क्र. २, पुणे येथे उत्साहात संपन्न झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी गुन्हे अन्वेषण विभाग, पुणेचे अपर पोलीस महासंचालक श्री. सुनील रामानंद यांनी प्रमुख पाहुणे डॉ. सुरेश गोसावी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या वर्षीच्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात एकूण २६ संघांनी सहभाग नोंदविला आहे. ५ ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात पोलिसांच्या विविध क्षेत्रांतील ज्ञान, कौशल्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडविणाऱ्या विविध स्पर्धा पार पडणार आहेत.
अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यांमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने अनुक्रमे १२, ११, ७, ४ आणि ११ पदके मिळवत विविध विजेतेपद तसेच उपविजेतेपदाची पारितोषिके पटकावली आहेत.
या मेळाव्याच्या माध्यमातून पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या व्यावसायिक ज्ञानासोबतच तांत्रिक कौशल्य, कार्यक्षमता आणि कर्तव्यनिष्ठेला व्यासपीठ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here