सागरी सुरक्षा चषक कबड्डी २०२६- पोयनाड पोलीस ठाण्याची पुरुष व महिला गटांत बाजी
पुरुष व महिला दोन्ही गटांत प्रथम क्रमांक
सागरी सुरक्षा चषक २०२६ च्या दुसऱ्या पर्वाची सांगता; वडखळ, श्रीवर्धन, मांडवा आणि दिघी सागरी पोलीस ठाण्यांच्या संघांनीही पटकावली पारितोषिके
रायगड :
सागरी सुरक्षेचा संदेश अधिक दृढ करण्यासाठी रायगड पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा २०२६’च्या दुसऱ्या पर्वातील पुरुष आणि महिला विभागांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. दोन्ही विभागांत पोयनाड पोलीस ठाण्याच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत दुहेरी बाजी मारली.

पुरुष विभागात पोयनाड पोलीस ठाण्याच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. वडखळ पोलीस ठाण्याचा संघ द्वितीय, तर श्रीवर्धन पोलीस ठाण्याचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला.

महिला विभागातही पोयनाड पोलीस ठाण्याच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. मांडवा पोलीस ठाण्याच्या संघाने द्वितीय, तर दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.



