माजी सैनिक राजेश परब यांना सदनिका खरेदीसाठी एक लाखांची मदत

0
15
माजी सैनिक राजेश परब यांना सदनिका खरेदीसाठी एक लाखांची मदत
माजी सैनिक राजेश परब यांना सदनिका खरेदीसाठी एक लाखांची मदत

माजी सैनिक राजेश परब यांना सदनिका खरेदीसाठी एक लाखांची मदत

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत धनादेशाचे वितरण; पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील पारपोली येथील माजी सैनिक राजेश भिसाजी परब यांना सदनिका खरेदीसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या अधिपत्याखालील सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत पात्र माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, दिव्यांग माजी सैनिक तसेच त्यांची अनाथ पाल्ये आणि अवलंबित यांना कल्याणकारी निधीतून विविध योजनांद्वारे शैक्षणिक मदत, आर्थिक सहाय्य आणि पुनर्वसनासाठी मदत दिली जाते.
या धनादेश वितरणावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रभारी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण कोळी तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
जिल्ह्यातील पात्र शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, दिव्यांग माजी सैनिक तसेच त्यांची अनाथ पाल्ये आणि अवलंबित यांनी शैक्षणिक मदत, स्वयंरोजगार आणि पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
या योजनांबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ०२३६२-२२८८२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here