अलिबागच्या पाणीपुरवठ्यासाठी सहा नवीन टाक्या उभारणार; विद्यानगर व श्रीबाग येथे कामांना सुरुवात

0
3
अलिबागच्या पाणीपुरवठ्यासाठी सहा नवीन टाक्या उभारणार;
अलिबागच्या पाणीपुरवठ्यासाठी सहा नवीन टाक्या उभारणार;

अलिबागच्या पाणीपुरवठ्यासाठी सहा नवीन टाक्या उभारणार;

विद्यानगर व श्रीबाग येथे कामांना सुरुवात
विद्यानगर व श्रीबाग येथे कामांना सुरुवात
अलिबाग :
अलिबाग शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नागरिकांना सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत. विद्यानगर आणि श्रीबाग येथे सुरू असलेल्या पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामाची वीज व बांधकाम सभापती प्रशांत मधुसूदन नाईक यांनी पाहणी केली.

 

या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध टप्प्यांत एकूण सहा पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन टाक्यांचे बांधकाम सध्या सुरू असून आणखी दोन टाक्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.
अलिबाग शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन ही योजना आखण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा मानस असल्याचे प्रशांत नाईक यांनी सांगितले.
या योजनेची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी शासनाकडून मंजूर निधीही वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे निधी उपलब्धतेसह बांधकामाची कामे नियोजित वेळेत पूर्ण होऊन अलिबागकरांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here