वाशीत गणेश नाईक यांचा जनता दरबार; २५० हून अधिक निवेदने प्राप्त

0
9
वाशीत गणेश नाईक यांचा जनता दरबार; २५० हून अधिक निवेदने प्राप्त
वाशीत गणेश नाईक यांचा जनता दरबार; २५० हून अधिक निवेदने प्राप्त

वाशीत गणेश नाईक यांचा जनता दरबार; २५० हून अधिक निवेदने प्राप्त

वाशी :
नागरिकांच्या सार्वजनिक समस्या, अडचणी आणि मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात १५ ऑक्टोबर रोजी आयोजित जनता दरबारात २५० हून अधिक निवेदने प्राप्त झाली. या जनता दरबारात विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या मांडत त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली.

नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला महत्त्व देऊन त्यांची अडचण समजून घेणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाची समस्या महत्त्वाची असून, शेवटच्या नागरिकाची भेट घेऊन त्याची अडचण समजून घेतल्याशिवाय आणि त्यावर आवश्यक कार्यवाही केल्याशिवाय जनता दरबार संपत नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.

जनतेच्या समस्या केवळ ऐकून घेणे नव्हे, तर त्यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. जनसेवा म्हणजे केवळ आश्वासन देणे नसून, जनतेने दाखवलेल्या विश्वासाला कृतीतून न्याय देण्याची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध प्रश्नांची दखल घेण्यात आली असून, त्यांच्या समस्यांवर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here