दामिनी पालव यांच्या कुटुंबीयांचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडून सांत्वन

0
6
दामिनी पालव यांच्या कुटुंबीयांचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडून सांत्वन
दामिनी पालव यांच्या कुटुंबीयांचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडून सांत्वन

दामिनी पालव यांच्या कुटुंबीयांचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडून सांत्वन

न्यायासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची ग्वाही

कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील दामिनी किरण पालव हिच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दामिनीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून संशयित आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील, असे दत्ता सामंत यांनी सांगितले. अशा घटनांची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये आणि समाजात योग्य संदेश जावा, यासाठी या प्रकरणात कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
दामिनीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
या भेटीदरम्यान जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, सभापती मिलिंद नाईक, संजय पडते, देवेंद्र नाईक, अरविंद करलकर, पंचायत समिती सदस्य नागेश आईर, पंचायत समिती सदस्या श्रावणी तेरसे, घनश्याम तेरसे, कीर्तीकुमार तेरसे, स्वरूप वाळके, काका कुडाळकर, विनायक राणे, सागर पालव, वर्देचे पोलीस पाटील तसेच कडावल-वर्दे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
दामिनीला न्याय मिळावा आणि संबंधित प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here