
लोकलमध्ये दसऱ्याचा उत्साह! छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळातर्फे रेल्वेचे पूजन; मोटरमन यांचा सन्मान
मुंबई :
दैनंदिन प्रवासाच्या धावपळीतही भारतीय संस्कृती आणि सण-उत्सवांची परंपरा जपण्याचा अनोखा उपक्रम छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळातर्फे राबविण्यात आला. वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान धावणाऱ्या सकाळी ८.१३ वाजताच्या लोकलमध्ये दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रेल्वेला तोरण बांधून विधिवत पूजन करण्यात आले, तसेच रेल्वे सुरक्षितपणे चालविण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या मोटरमन यांचा सन्मान करण्यात आला.


