उरणकरांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही, कंत्राटदारांना मात्र प्राधान्य! नगराध्यक्ष भावना घाणेकर यांची मुख्याधिकाऱ्यांवर टीका

0
6
उरणकरांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही, कंत्राटदारांना मात्र प्राधान्य! नगराध्यक्ष भावना घाणेकर

उरण :
उरण फुटबॉल अकॅडमी असोसिएशनचे प्रतिनिधी क्रिकेट मैदानासंदर्भात निवेदन देण्यासाठी आले असताना त्यांना भेटण्यासाठी उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याकडे वेळ नसल्याची बाब समोर आली आहे. यावरून नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर टीका केली.
उरणकरांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही, कंत्राटदारांना मात्र प्राधान्य! नगराध्यक्ष भावना घाणेकर यांची मुख्याधिकाऱ्यांवर टीका
उरणकरांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही, कंत्राटदारांना मात्र प्राधान्य! नगराध्यक्ष भावना घाणेकर यांची मुख्याधिकाऱ्यांवर टीका
क्रिकेट मैदानासंदर्भातील प्रश्न मांडण्यासाठी आलेल्या फुटबॉल अकॅडमीच्या प्रतिनिधींना भेटण्यासाठी वेळ न देणे, ही दुर्दैवी बाब असल्याचे भावना घाणेकर यांनी म्हटले. यावेळी अकॅडमीच्या प्रतिनिधीला मुख्याधिकाऱ्यांकडे घेऊन गेले असता, सर्वसामान्य नागरिकांना ताटकळत ठेवून कंत्राटदारांना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसून आल्याचा आरोप त्यांनी केला.
“अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत, कंत्राटदारांचे नाहीत,” असे स्पष्ट शब्दांत सांगत नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली. उरणकरांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असेल, तर ते योग्य नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करणे आणि त्यांना योग्य प्रतिसाद देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे उरण नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी व निवेदनांना प्राधान्य द्यावे, अशी भूमिका नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here