दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये FDA ची धाड; ४.२१ कोटींचा अन्नसाठा जप्त
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये FDA ची मोठी कारवाई
₹4.21 कोटींचा अन्नसाठा जप्त; मिसब्रँडेड व निकृष्ट दर्जाचा संशय.
दिवाळी व सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
पनवेल येथील कामोठे, जवाहर को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटमधील M/s. Ajfan International Retails LLP या आस्थापनावर धाड टाकून एकूण ₹4,21,06,961 किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.
अन्नपदार्थांच्या लेबलिंग व गुणवत्तेबाबत आढळलेल्या बाबींच्या अनुषंगाने, संबंधित अन्नपदार्थ मिसब्रँडेड असल्याचे तसेच निकृष्ट दर्जाचे असण्याचा संशय असल्याने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत कारवाई करण्यात आली.
अन्न सुरक्षा आयुक्त श्री. तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.