रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांच्या समस्यांबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा
रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांच्या समस्यांबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा
मुंबई :
रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांना भेडसावणाऱ्या शासकीय स्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या शैक्षणिक कामकाजात येणाऱ्या अडचणी दूर करून विविध शाखांचे कामकाज अधिक सुरळीत व्हावे, या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
या बैठकीत रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांसमोरील समस्या, त्यांचे स्वरूप आणि त्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. संस्थेच्या शैक्षणिक कार्याला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि प्रशासकीय प्रश्न मार्गी लागावेत, यावर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्य तथा खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, माजी आमदार बाळाराम पाटील आणि संस्थेचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली असून, आवश्यक शासकीय उपाययोजनांद्वारे हे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.