भेसळमुक्त दिवाळी फराळाची मेजवानी! ‘उमेद’चा दिवाळी फराळ महोत्सव ३ ते ७ नोव्हेंबरदरम्यान बेलापूरमध्ये
भेसळमुक्त दिवाळी फराळाची मेजवानी! ‘उमेद’चा दिवाळी फराळ महोत्सव ३ ते ७ नोव्हेंबरदरम्यान बेलापूरमध्ये
महिला बचत गटांच्या पारंपरिक फराळाला हक्काची बाजारपेठ
सांगलीचे मनुके, धाराशिवची चणाडाळ, अहिल्यानगरचे साजूक तूप आणि शुद्ध घाण्याच्या तेलाची उत्पादने उपलब्ध
नवी मुंबई :
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अस्सल, शुद्ध आणि पारंपरिक चवीचा फराळ उपलब्ध करून देण्यासाठी ‘उमेद’ अभियानांतर्गत दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकाजवळील अर्बन हाट येथे हा महोत्सव सुरू आहे.
‘भेसळयुक्त फराळाला म्हणा कायमचा पूर्णविराम’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील अस्सल खाद्यपदार्थ आणि बचत गटांतील महिलांनी तयार केलेल्या पारंपरिक फराळाला विशेष स्थान देण्यात आले आहे.
या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सांगली जिल्ह्यातील अस्सल मनुके, धाराशिवची चविष्ट व सकस चणाडाळ, आरोग्यासाठी उपयुक्त लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील साजूक तूप यांसारखी उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महिला बचत गटांतील भगिनींच्या हातची पारंपरिक चव आणि अस्सल घटकांपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
या महोत्सवात ग्राहकांना ऑर्डर देऊन पदार्थ तयार होताना प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यानंतर खरेदी करून घरी घेऊन जाण्याची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादनांची गुणवत्ता आणि शुद्धता प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
महोत्सवाचे ठिकाण व वेळ :
तारीख : ३ ते ७ नोव्हेंबर २०२६
वेळ : सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत
ठिकाण : अर्बन हाट, सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकाजवळ, नवी मुंबई.
महिला बचत गटांच्या मेहनतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे आणि नागरिकांना पारंपरिक चवीचा फराळ उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. नागरिकांनी या महोत्सवाला आवर्जून भेट देऊन आपल्या कुटुंबासाठी घरगुती चवीचा