पिंगुळी कला महोत्सवातून रंगणार कोकणच्या लोककलेचा अनोखा आविष्कार; ६ व ७ नोव्हेंबरला आयोजन
पिंगुळी कला महोत्सवातून रंगणार कोकणच्या लोककलेचा अनोखा आविष्कार; ६ व ७ नोव्हेंबरला आयोजन
पिंगुळी, ता. कुडाळ :
कोकणच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. पिंगुळी येथे ६ व ७ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘पिंगुळी कला महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. कोकणच्या मातीतील लोककलेचे विविध रंग, परंपरा आणि सांस्कृतिक वैभव या महोत्सवातून अनुभवता येणार आहे.
हा महोत्सव सायंकाळी ६.३० वाजता पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांच्या ठाकर आदिवासी कलांगण, संग्रहालय व आर्ट गॅलरी, गुढीपूर, पिंगुळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे होणार आहे.
कोकणातील लोककलेचा समृद्ध वारसा जाणून घेण्यासाठी आणि आपल्या पारंपरिक कलांचे जतन व संवर्धन करण्याच्या भावनेतून या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोककला, संस्कृती आणि परंपरांचा उत्सव अनुभवण्यासाठी कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.