लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त वाशीत कोळीगीतांचा सांस्कृतिक जल्लोष
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाशी येथे ‘कोळीगीतांच्या कोळीवाऱ्यात, ये दादा आवर ये’ कार्यक्रमाचे आयोजन
वाशी :
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘कोळीगीतांच्या कोळीवाऱ्यात, ये दादा आवर ये’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा आणि कोळी संस्कृतीचा मनमोहक आविष्कार रसिकांना अनुभवायला मिळाला.



