समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागात २१ व २२ नोव्हेंबरला जनसुनावणी

0
9
समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागात २१ व २२ नोव्हेंबरला जनसुनावणी
समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागात २१ व २२ नोव्हेंबरला जनसुनावणी

समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागात २१ व २२ नोव्हेंबरला जनसुनावणी

नागरिकांना मते मांडण्याची संधी

नवी मुंबई :
समान नागरी कायदा (UCC) लागू करण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय स्तरावर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीच्या माध्यमातून नागरिकांना विवाह, घटस्फोट, लिव्ह-इन नातेसंबंध, भरण-पोषण, पालकत्व आणि वारसाहक्क यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आपली मते व सूचना मांडण्याची संधी मिळणार आहे.
ही जनसुनावणी नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. जनसुनावणीस उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी निर्धारित वेळेच्या एक तास आधी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होणार नाही, त्यांना संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनसुनावणीत सहभागी होता येणार आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीनेही नागरिकांना आपली मते नोंदविता येणार आहेत. त्यासाठी www.ucc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोकण विभागातील नागरिकांनी या जनसुनावणीत सक्रिय सहभाग नोंदवून आपली मते आणि सूचना मांडाव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here