महावितरणमध्ये २३ हजार पदांची थेट भरती? सोशल मीडियावरील जाहिराती बनावट; उमेदवारांना सावधानतेचा इशारा

0
9

मुंबई :
महावितरणमध्ये तब्बल २३ हजारांहून अधिक विविध पदांसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत न घेता थेट भरती सुरू असल्याच्या जाहिराती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. केवळ दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती असल्याचे सांगून हजारो रुपयांच्या वेतनाचे आमिष दाखवले जात आहे. मात्र, या जाहिराती पूर्णपणे दिशाभूल करणाऱ्या असून त्यांचा महावितरणशी कोणताही संबंध नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध न झालेल्या कोणत्याही भरती जाहिरातींवर उमेदवारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. महावितरणमधील विविध पदांच्या भरती प्रक्रियेबाबतच्या अधिकृत जाहिराती तसेच वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती केवळ महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरच उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे भरतीसंदर्भातील कोणतीही माहिती मिळाल्यास उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावर तिची खातरजमा करावी.
तसेच भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकही महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरच उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे सोशल मीडियावरून मिळणाऱ्या संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे. अशा लिंकद्वारे आर्थिक फसवणूक किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी विशेष खबरदारी घ्यावी. बनावट भरती जाहिराती आणि चुकीच्या माहितीला बळी पडू नये, असे आवाहन महावितरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here