रायगडच्या माणगावमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पाबाबत मंत्रालयात बैठक

0
10
रायगडच्या माणगावमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पाबाबत मंत्रालयात बैठक
रायगडच्या माणगावमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पाबाबत मंत्रालयात बैठक

रायगडच्या माणगावमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पाबाबत मंत्रालयात बैठक

माणगाव तालुक्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क प्रकल्पातील अडचणी व प्रलंबित प्रश्नांवर उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत मंत्रालयात चर्चा.
रायगड :
रायगड जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने माणगाव तालुक्यात प्रस्तावित असलेल्या बल्क ड्रग पार्क प्रकल्पाबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत प्रकल्पाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या अडीअडचणी आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाशी निगडित विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
राज्यातील औद्योगिक विकासाला गती देणे, गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे या दृष्टीने बल्क ड्रग पार्कसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या बैठकीत झालेल्या चर्चेकडे रायगड जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here