PUC Certificate New Rules 2026: BS-VI वाहनांना ३ वर्षांची वैधता; जुन्या वाहनांसाठी नवे नियम
नवी दिल्ली :
देशातील वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी (PUC) संदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांचे उत्सर्जन मानक, वय आणि वापराची श्रेणी यानुसार पीयूसी प्रमाणपत्राची वैधता निश्चित केली आहे. केंद्रीय मोटार वाहन (सोळावी सुधारणा) नियम, २०२६ अंतर्गत हे बदल करण्यात आले असून, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी राजपत्रात अधिसूचना प्रकाशित झाल्यानंतर ते लागू झाले आहेत.
नवीन नियमानुसार, जुन्या उत्सर्जन मानकांनुसार तयार झालेल्या वाहनांना कमी कालावधीचे पीयूसी प्रमाणपत्र मिळणार आहे. तर नवीन BS-VI वाहनांना त्यांच्या वयानुसार अधिक कालावधीची वैधता देण्यात आली आहे.
कोणत्या वाहनासाठी किती काळ वैध असेल PUC प्रमाणपत्र?
नवीन नियमांनुसार पीयूसी प्रमाणपत्राची वैधता पुढीलप्रमाणे असेल.
| वाहनांचा प्रकार | पीयूसी प्रमाणपत्राची वैधता |
|---|---|
| BS-I, BS-II आणि BS-III वाहने | ३ महिने |
| BS-IV वाहने | ६ महिने |
| BS-VI खासगी वाहने (६ वर्षांपर्यंत) | ३ वर्षे |
| BS-VI खासगी वाहने (६ ते १० वर्षे) | १ वर्ष |
| BS-VI खासगी वाहने (१० वर्षांपेक्षा जास्त) | ६ महिने |
| BS-VI व्यावसायिक वाहने (६ वर्षांपर्यंत) | २ वर्षे |
| BS-VI व्यावसायिक वाहने (६ ते १० वर्षे) | १ वर्ष |
| BS-VI व्यावसायिक वाहने (१० वर्षांपेक्षा जास्त) | ६ महिने |


