भारतीयांसाठी मलेशियाचा व्हिसा-मुक्त प्रवास बंद होणार; १ जानेवारी २०२७ पासून व्हिसा अनिवार्य

0
10
भारतीयांसाठी मलेशियाचा व्हिसा-मुक्त प्रवास बंद होणार; १ जानेवारी २०२७ पासून व्हिसा अनिवार्य
भारतीयांसाठी मलेशियाचा व्हिसा-मुक्त प्रवास बंद होणार; १ जानेवारी २०२७ पासून व्हिसा अनिवार्य

भारतीयांसाठी मलेशियाचा व्हिसा-मुक्त प्रवास बंद होणार; १ जानेवारी २०२७ पासून व्हिसा अनिवार्य

नवी दिल्ली :
परदेशात पर्यटनासाठी जाण्याचा विचार करणाऱ्या भारतीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मलेशिया सरकारने भारतीय नागरिकांसाठी सुरू असलेली व्हिसा-मुक्त प्रवेशाची सुविधा ३१ डिसेंबर २०२६ नंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२७ पासून मलेशियाला जाणाऱ्या भारतीय पासपोर्टधारकांना प्रवासापूर्वी वैध व्हिसा घेणे अनिवार्य असणार आहे. मलेशियाच्या इमिग्रेशन विभागाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
१ डिसेंबरपासून व्हिसासाठी अर्ज करता येणार
नवीन नियमांची अंमलबजावणी होण्यापूर्वी भारतीय पर्यटकांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी १ डिसेंबर २०२६ पासून मलेशियाच्या अधिकृत ‘मायव्हिसा’ (MyVISA) ऑनलाइन पोर्टलवर व्हिसासाठी अर्ज करण्याची सुविधा सुरू होणार आहे. व्हिसा अर्जासाठी भरलेले प्रक्रिया शुल्क परत मिळणार नाही. अर्ज मंजूर झाला किंवा नाकारला गेला, तसेच प्रवासाचा बेत बदलला किंवा सरकारी धोरणात बदल झाला, तरी शुल्क परत केले जाणार नसल्याचे मलेशियाच्या इमिग्रेशन विभागाने स्पष्ट केले आहे.
३० दिवसांच्या व्हिसा-मुक्त वास्तव्यास पूर्णविराम
डिसेंबर २०२३ पासून भारतीय नागरिकांना पर्यटन, सामाजिक भेटी आणि अन्य पात्र भेटींसाठी मलेशियात ३० दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय राहण्याची सुविधा देण्यात आली होती. ही सुविधा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत कायम राहणार आहे. मात्र, काही भारतीय नागरिक पर्यटक म्हणून मलेशियात जाऊन नोकरीच्या शोधात असल्याच्या तक्रारी आणि निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
क्वालालंपूरमधील भारतीय उच्चायुक्तालयाने यापूर्वीच व्हिसा-मुक्त प्रवेश सुविधेचा गैरवापर करून रोजगाराच्या शोधात मलेशियात जाणाऱ्या नागरिकांना सावध केले होते. पर्यटनासाठी दिलेल्या प्रवेश परवानगीवर नोकरी करणे कायदेशीर नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.
पर्यटकांनी काय काळजी घ्यावी?
१ जानेवारी २०२७ नंतर मलेशियाला जाण्याचे नियोजन करणाऱ्या भारतीय नागरिकांनी प्रवासापूर्वी व्हिसा मंजूर करून घेणे आवश्यक आहे. तसेच पासपोर्टची किमान सहा महिन्यांची वैधता, परतीचे विमान तिकीट, हॉटेल आरक्षण आणि मलेशिया डिजिटल अरायव्हल कार्ड (MDAC) यासंबंधीच्या अटींची पूर्तता करावी लागेल.
या निर्णयामुळे मलेशियाला पर्यटनासाठी जाणाऱ्या भारतीयांना आता अतिरिक्त व्हिसा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असून, नववर्षाच्या सुट्ट्यांचे नियोजन करणाऱ्या पर्यटकांनी याची विशेष नोंद घेणे आवश्यक आ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here