रत्नागिरीच्या मीनल हळदनकर यांना प्रतिष्ठेचा ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार; उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार

0
9

‘डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक’ विभागस्तरीय पुरस्काराने सन्मान; जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार

रत्नागिरी :
वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आणि ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून वाचकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या रत्नागिरी नगर वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. मीनल हळदनकर यांना सन २०२४-२५ या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा विभागस्तरीय ‘डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मीनल हळदनकर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उदय सामंत यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथपालांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, मीनल हळदनकर यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची पोचपावती असल्याचे या गौरवातून अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here