वैभववाडीत चिमुरडीवरील अत्याचाराचा आरोप; शिक्षक पिता अटकेत

0
5
वैभववाडीत चिमुरडीवरील अत्याचाराचा आरोप; शिक्षक पिता अटकेत
लोणेरे वैभववाडीत चिमुरडीवरील अत्याचाराचा आरोप; शिक्षक पिता अटकेत तील अत्याचार प्रकरणावर संताप; आरोपीला फाशीची मागणी, बंदचा इशारा

 वैभववाडीत चिमुरडीवरील अत्याचाराचा आरोप; शिक्षक पिता अटकेत

पत्नीच्या फिर्यादीवरून बलात्कार व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा; न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी

वैभववाडी (प्रतिनिधी) :
वैभववाडी तालुक्यातील एका गावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच वडिलांनी अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी मुलीच्या आईने वैभववाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी शिक्षक पित्याविरुद्ध बलात्कार व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून शुक्रवारी रात्री उशिरा त्याला अटक केली. शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक हा वैभववाडी तालुक्याबाहेरील रहिवासी असून सध्या तालुका मुख्यालयाजवळील एका गावात वास्तव्यास आहे. त्याचे यापूर्वी दोन विवाह झाले असून दोन्ही पत्नी त्याच्यासोबत राहत नाहीत. २०२० मध्ये त्याने तिसरा विवाह केला असून या दाम्पत्याला साडेचार वर्षांची मुलगी आहे.
आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये सातत्याने कौटुंबिक वाद होत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या वादांमुळे पत्नी सुमारे दोन वर्षे माहेरी राहत होती. जून २०२६ मध्ये ती पुन्हा पतीसोबत राहण्यासाठी आली होती. मात्र, त्यानंतरही दोघांमधील वाद सुरूच होते.
शुक्रवारी पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर पत्नी काही वेळासाठी घराबाहेर गेली होती. याच काळात आरोपीने आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप पत्नीने फिर्यादीत केला आहे. घटनेनंतर तिने शुक्रवारी सायंकाळी उशिरा वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला रात्री उशिरा अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव करीत आहेत.
या घटनेमुळे वैभववाडी तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here