आत्मसंतुलन केंद्रात आवळा वृक्षाचे पूजन; आमदार मंदाताई म्हात्रे उपस्थित

0
16
आत्मसंतुलन केंद्रात आवळा वृक्षाचे पूजन; आमदार मंदाताई म्हात्रे उपस्थित
आत्मसंतुलन केंद्रात आवळा वृक्षाचे पूजन; आमदार मंदाताई म्हात्रे उपस्थित

आत्मसंतुलन केंद्रात आवळा वृक्षाचे पूजन; आमदार मंदाताई म्हात्रे उपस्थित

पुणे :
आयुर्वेदिक परंपरेचा सन्मान आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून आयुर्वेदिक बालाजी तांबे यांच्या आत्मसंतुलन केंद्रात आवळा वृक्षाचे विधिवत पूजन पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्याला आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित राहून पूजनात सहभाग घेतला.

आयुर्वेदात आवळ्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आवळा हा केवळ औषधी वृक्ष नसून निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी मानली जाते. आवळ्यापासून तयार होणाऱ्या आरोग्यवर्धक च्यवनप्राशाच्या निर्मितीपूर्वी आवळा वृक्षाचे पूजन करण्याची परंपरा जपली जाते. या पूजनविधीतून निसर्गातील प्रत्येक घटकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच भारतीय आयुर्वेदिक ज्ञानपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आत्मसंतुलन केंद्रातील या सोहळ्याचे कौतुक करत श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याची भावना व्यक्त केली. या प्रसंगी डॉ. वीणा बालाजी तांबे, डॉ. सुनील तांबे, डॉ. मालविका तांबे यांच्यासह तांबे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
मंत्रोच्चार, पारंपरिक विधी आणि प्रसन्न आध्यात्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यातून आयुर्वेदिक वारशाचे जतन, निसर्गसंवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. परंपरेचा सन्मान आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमामुळे आत्मसंतुलन केंद्रातील वातावरण भक्तिरसाने भारून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here