कुडाळदेशकर प्रीमियर लीगच्या दशकपूर्तीनिमित्त ‘केपीएल अश्वमेध २०२५’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन

0
12

कुडाळ :
कुडाळदेशकर प्रीमियर लीगच्या (KPL) २०१६ ते २०२५ या दशकभरातील क्रिकेट स्पर्धांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ‘केपीएलचा अश्वमेध २०२५’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे. कुडाळदेशकर प्रीमियर लीगच्या दहा वर्षांच्या प्रवासाचा आढावा या प्रकाशनातून मांडण्यात आला आहे.

कुडाळदेशकर प्रीमियर लीगच्या दशकभरातील स्पर्धा, त्यातील संस्मरणीय क्षण, विविध आठवणी, कथा आणि छायाचित्रांचा या गौरव ग्रंथात समावेश करण्यात आला आहे. २०१६ ते २०२५ या कालावधीत झालेल्या क्रिकेट स्पर्धांचा प्रवास शब्दबद्ध आणि छायाचित्रबद्ध करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.
कुडाळदेशकर आद्य ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले असून, रणजित देसाई यांनी संपादनाची जबाबदारी सांभाळली आहे. केपीएलच्या दशकभरातील वाटचालीचे दस्तऐवजीकरण करणारा हा गौरव ग्रंथ क्रिकेटप्रेमी आणि स्पर्धेशी जोडलेल्या सर्वांसाठी आठवणींचा ठेवा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here