मुंबईत तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचा शुभारंभ; ३० देशांतील २०० हून अधिक शहरांचे प्रतिनिधी सहभागी

0
11

मुंबई :
जागतिक नागरी नेतृत्व, शहरांचा विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचा (3rd World Mayors’ Forum) आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या दोन दिवसीय परिषदेत जगभरातील विविध शहरांचे महापौर आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIILSG) यांच्या १०० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचे औचित्य साधून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेत ३० देशांतील २०० हून अधिक शहरांचे ५०० पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
या परिषदेनिमित्त मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जगभरातून आलेल्या विविध शहरांच्या महापौरांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. यावेळी नागरी प्रशासन, शहरांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या यशस्वी कार्यपद्धती आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांवर विचारांची देवाणघेवाण झाली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईचा आवाज मांडण्याची संधी मिळणे हा अभिमानाचा अनुभव असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. जगभरातील शहरांच्या यशस्वी कार्यपद्धती आणि नाविन्यपूर्ण कल्पना समजून घेता आल्या असून, त्यातून मुंबईला अधिक सक्षम आणि प्रगत बनविण्याच्या संकल्पाला नवे बळ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह, पश्चिम बंगालचे राज्यमंत्री उमेश राय,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here