ॲड. अंजली साळवे-विठणकर यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

0
8

शशिकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन; महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी

मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष (NMC) पदी ॲड. अंजली साळवे-विठणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांच्या मान्यतेने ही नियुक्ती झाली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या नियुक्तीबद्दल त्यांनी ॲड. साळवे-विठणकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ॲड. अंजली साळवे-विठणकर यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
ॲड. अंजली साळवे-विठणकर यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेत महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, महिलांना संघटित करणे आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे, या कामांमध्ये त्यांच्या नेतृत्वाचा मोठा हातभार लागेल, असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
नवीन जबाबदारीच्या माध्यमातून ॲड. अंजली साळवे-विठणकर पक्षाच्या महिला संघटनेचे कार्य अधिक व्यापक करतील, अशी अपेक्षा व्यक्त करत शशिकांत शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here