संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाडच्या चवदार तळ्याला भेट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन;
२६/११ हल्ल्यातील शहीद वीरांना श्रद्धांजली
महाड :
संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या चवदार तळ्याच्या परिसरात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.



