जांभीवली एमआयडीसीच्या भूसंपादन मोबदल्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांची आमदार मनिषा कायंदे यांच्याशी चर्चा
जांभीवली एमआयडीसीच्या भूसंपादन मोबदल्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांची आमदार मनिषा कायंदे यांच्याशी चर्चा
ठाणे :
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील मौजे जांभीवली येथील एमआयडीसीसाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाच्या मोबदल्यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार मनिषा कायंदे यांच्याशी चर्चा केली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन बैठकीच्या माध्यमातून हा संवाद साधण्यात आला.
यावेळी जांभीवली एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला १९७२ मधील शासकीय दरानुसार देण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार मनिषा कायंदे यांना दिली.