नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध

0
8

कणकवली:- दि. २७-
मालवणसह १० गावांची मुळ ग्रामदेवता असलेल्या नांदरुखची ग्रामदेवता गिरोबाचा जत्रोत्सव भाविकांच्या अलौट गर्दीत संपन्न झाला. गिरोबा आणि कुल स्वामिनी लक्ष्मी सह बारा-पाच देवतांची गाभार्यात केलेली आकर्षक सजावट, शोभिवंत फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी, तलावात उभारलेला पाण्याचा नयनरम्य कारंजा आणि रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध झालेत.

पालखी प्रदक्षिणेनंतर वालावलकर पारंपारिक दशावतारी नाट्य मंडळाने सादर केलेल्या शंकराच्या तिसर्या डोळ्यातून जन्म झालेला “रुद्राश जन्म” या नाटकाने भाविक मंत्रमुग्ध झालेत. जत्रोत्सवात मालवणसह दहाही गावांतील भाविकांनी अलौट गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत ओटी भरणाऱ्या महिलांची रांग लागली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here