महानगरपालिका निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; मुंबईत ठाकरे गट आघाडीवर, महायुतीचीही मजबूत पकड

0
26
राज्यसभेच्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा
राज्यसभेच्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा

महानगरपालिका निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; मुंबईत ठाकरे गट आघाडीवर, महायुतीचीही मजबूत पकड

राज्यातील सर्वात बहुप्रतिक्षित महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील सुमारे २९ महानगरपालिकांसाठी झालेल्या या मतदानाचे निकाल शुक्रवारी, दि. १६ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून हळूहळू समोर येऊ लागले असून, राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होत आहे.

आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटावर आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मनसेसोबत केलेली युती उद्धव ठाकरे यांच्यासाठी फायदेशीर ठरल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील अनेक नगरसेवक आपल्या बाजूने वळवले होते. त्यामुळे मुंबईत ठाकरे गट कमकुवत होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, राज ठाकरे यांच्या मनसेसोबत झालेल्या युतीमुळे ठाकरे बंधूंचा प्रभाव पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणात दिसून आला आहे.

मुंबई महानगरपालिकेतील आतापर्यंतची स्थिती
मुंबईत उद्धव ठाकरे गट ५८ जागांवर आघाडीवर असून, एकनाथ शिंदे गट २० जागांवर आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्ष ५७ जागांवर आघाडीवर असून, मनसे ७, काँग्रेस ९, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १ आणि इतर ५ जागांवर आघाडीवर आहेत. भाजप आणि शिंदे गट मिळून महायुती ८३ जागांवर आघाडीवर असून, मुंबईतील स्थानिक राजकारणात त्यांची ताकदही ठळकपणे दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगरची आकडेवारी
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप १०, शिंदे गट ८, ठाकरे गट ४, एमआयएम ७, काँग्रेस १ आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) २ जागांवर आघाडीवर आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेतील स्थिती
चंद्रपूरमध्ये काँग्रेस ९ जागांवर आघाडीवर असून भाजप ८, शिवसेना (शिंदे गट) २, शिवसेना (ठाकरे गट) ४, राष्ट्रवादी १, वंचित २, एमआयएम २ आणि अपक्ष ४ जागांवर आघाडीवर आहेत.

एकूणच, राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल सत्तासमीकरणे बदलणारे ठरणार असून, अंतिम निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे आणि नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here